Blog

नाशिक रोड शिखरेवाडी जय भवानी रोड तसेच इंदिरानगर येथे सोनसाखळी चोरांनी घातला धुमाकूळ

पोलीस यंत्रणेचा लागणार कस, नाशिक शहर आयुक्तालयाच्या हद्दीत नाशिक रोड परिसरात शिखरेवाडी जय भवानी रोड तसेच इंदिरानगर येथे सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातलेला आहे. दिनांक 6/ 4 /2024 रोजी शनिवारी सकाळी ठीक आठ वाजता शिखरेवाडी ग्राउंड शेजारील रस्त्यावरून मॉर्निंग करताना एका महिलेच्या गळ्यातून अडीच तोळे सोन्याची चैन चोरट्यांनी खेचून नेली. सध्या रोजच सोनसाखळी चोरी होत आहे. बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज वरून सुद्धा गुन्हेगारांची ओळख पटत नाहीये. सदर गुन्हेगार हे तोंडाला मास्क लावून हेल्मेट घालून बिना नंबरच्या टू व्हीलर चा वापर करताना दिसत आहेत. गुन्हेगारांच्या मुस्क्या व आवळणे गरजेचे ठरणार आहे. सध्या सणावाराचे तसेच लग्नसराईचे दिवस असताना लोकांना त्यांचे दाग दागिने वापरणे मुश्किल झाले आहे. नागरिकांनी सुद्धा जागरूक राहून विना नंबरची बाईकवरून कोणी मास्क लावून चकरा मारीत असेल तर त्वरित पोलिसांना कळवणे गरजेचे आहे. 112 (एकशे बारा) या क्रमांकावर कॉल करून सूचना देणे आवश्यक आहे. तेव्हा या प्रकाराला काही प्रमाणात आवळा बसू शकेल. नाशिक समाचार ब्युरो, नाशिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *