Blog

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव नाशिक रोड येथे साजरा

भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्याय शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला चालना दिली. महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात.आयुष्य मोठे नसावे तर ते महान असावे. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाही. शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोटवानी रोड येथे आयोजित कार्यक्रमास उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे साहेब उपस्थित होते.त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले आणि भीमवंदनेचा कार्यक्रम पार पडला. यावेळेस मनसे नेते रोहन देशपांडे, न्यू नाशिक समाचार चे संचालक शेखर फडताळे सामाजिक कार्यकर्ते सचिन कर्डेल, बर्वे, जाधव, गांगुर्डे, चव्हाण,जगताप, रोहीकर,कदम,ओढाणे, पगारे आदी उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद साखरे यांच्या सोशल ग्रुपच्या वतीने प्रीती भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मोठ्या उत्साहात जयंती उत्सव नाशिक रोड येथे साजरा करण्यात येत आहे. नाशिक समाचार ब्युरो, नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *