नवीन नासिक समाचार चे संचालक श्री शेखर रामचंद्र फडताळे यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती (ऑल इंडिया लेव्हल, केंद्र शासन मान्यता प्राप्त ) या संस्थेच्या नाशिक जिल्हा संघटन या पदावर ती नियुक्ती करण्यात आली आहे, त्या संदर्भात समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर साहेब यांनी पत्राद्वारे 24 /03/ 2024 पासून पुढील कामकाजाकरता जिल्हास्तरीय संघटन मजबूत करण्याकरिता, सामान्य माणसाच्या समस्या तसेच त्यांना होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या जाचापासून मुक्त करण्याकरता,मदत करण्याकरता ही नियुक्ती करण्यात येत आहे,या संघटनेचे संपूर्ण भारतभर कार्यक्षेत्र असून श्री प्रदीप पाटील खंडापूरकर साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष ) यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचे विविध उपक्रम राबवून, जनजागृती करून, भ्रष्टाचाराला आळा कसा बसेल याबाबत काम करण्याकरिता ही नियुक्ती करण्यात आलेली आहे, तरी नागरिकांनी त्यांच्या काही तक्रारी असल्यास खालील दिलेल्या नंबर वरती तसेच मेल वरती त्या पाठवाव्यात, त्यासंबंधी संपूर्ण कार्यवाही संघटने कडून करण्यात येईल, सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल ह्या मुख्य हेतूने प्रेरित होऊन, ही संघटना काम करीत आहे, श्री शेखर रामचंद्र फडताळे यांची झालेली ही नियुक्ती त्यांचे सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात असलेले कार्य यामुळे करण्यात आली असून,निश्चितच सामान्य जनते करता फायदेशीर ठरेल, त्यांच्या नियुक्तीचे विविध क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे.
Related Articles
ना.रोड परिसरांत सामान्य नागरिकांना टवाळखोरांकडून अत्याचार व मारहाणीला सामोरे जावे लागत असून यांमूळे नागरिकांमध्ये भिती
ना.रोड परिसरांत सामान्य नागरिकांना टवाळखोरांकडून अत्याचार व मारहाणीला सामोरे जावे लागत असून यांमूळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.पोलिसांचा वचक कमी पडल्यामुळे टवाळखोर अश्या पध्दतीने दिवसा ढवळ्या उतमात करताना दिसून येताय.विषेश म्हणजे अश्या घटना सिसीटीव्ही मध्ये येऊनही वारंवार होत असल्याने सीसिटीव्ही कैद घटनांवर सेक्शन तर दूर पण ॲक्शन देखील होत नाही यांमूळे नागरिकामध्ये नाराजी उमटत आहे […]
शनिवार दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी श्री म्हसोबा महाराज यांची यात्रा संपन्न
म्हसोबा महाराज की जय, श्री म्हसोबा महाराज प्रसन्न,श्री म्हसोबा महाराज हे भाविकांचे आशास्थान बनलेले आहे. नाशिक पुणे हायवे स्थित हे देवस्थान असून याचे संस्थापक कैलासवाशी लक्ष्मणराव गोपाळराव कदम हे होते त्यांच्याच कृपा आशीर्वादाने पुढेही परंपरा कायम चालत आलेली आहे या देवस्थानाची आख्यायिका अशी आहे की या ठिकाणी आपण इच्छा बोलल्यानंतर ती पूर्ण होते, ती पूर्ण […]
नाशिक रोड शिखरेवाडी जय भवानी रोड तसेच इंदिरानगर येथे सोनसाखळी चोरांनी घातला धुमाकूळ
पोलीस यंत्रणेचा लागणार कस, नाशिक शहर आयुक्तालयाच्या हद्दीत नाशिक रोड परिसरात शिखरेवाडी जय भवानी रोड तसेच इंदिरानगर येथे सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातलेला आहे. दिनांक 6/ 4 /2024 रोजी शनिवारी सकाळी ठीक आठ वाजता शिखरेवाडी ग्राउंड शेजारील रस्त्यावरून मॉर्निंग करताना एका महिलेच्या गळ्यातून अडीच तोळे सोन्याची चैन चोरट्यांनी खेचून नेली. सध्या रोजच सोनसाखळी चोरी होत आहे. […]