गुढीपडावा या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून हा सण साजरा होतो. प्रत्येक धर्माचे लोक गुढीपाडव्याचे आपापल्या पद्धतीने स्वागत करतात. हिंदू धर्मामध्ये आपल्या दारामध्ये उंच काठी रोवून त्यावरती नवीन वस्त्र लावले जाते, फुलांच्या माळा, हरडे करडे, कडूलिंबाची पाने, खोबऱ्याची वाटी,गुळ लावून काठीला सजवले जाते,त्यावर तांब्याचा तांब्या ठेवून त्या गुढीची विधिवत पूजा केली जाते.घरामध्ये सुख समृद्धी यावी याचे ते प्रतीक मानले जाते. ज्योतिष ग्रंथानुसार वर्षभरात साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा मानला जातो म्हणूनच लोक या दिवशी विविध प्रकारच्या नवीन वस्तूंची खरेदी करत असतात प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास भोगून याच दिवशी आयोध्या मध्ये प्रवेश केला होता. त्यांचे संपूर्ण आयोध्या वासीयांनी भव्य दिव्य स्वागत केले तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. आदर्श जीवन कसे असते, दृष्टांचा नाश करून राक्षसांचा नाश करून, प्रभू रामचंद्र जेव्हा आयोध्येत परतले त्यावेळेस अशाच प्रकारच्या गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले गेले.
तसेच संकासुराने म्हणजे एका राक्षसाने खूप उत्पाद माजवला होता, या शंका सुराचा पराभव करण्याकरिता एका कुंभाराने 6000 मातीचे पुतळे तयार केले आणि त्यांना जिवंत केले आणि या संकासुराचा वध केला. त्या कुंभाराचे नाव होते शालिवाहन तेव्हापासून शालिवाहन पर्वाची सुरुवात झाली अशी आख्यायिका आहे.
दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे समजले जाते. गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो.
नवीन नाशिक समाचार च्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.