भ्रष्टाचार मुळापासून नष्ट करण्याकरता तळागाळापासून गाव खेड्यांपासून तर मोठमोठ्या शहरात निर्भीडपणे कार्य करीत असलेली संघटना म्हणजे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ही संघटना कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित किंवा संलग्न नाही संघटनेची स्वतःची कार्यकारणी असून राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनेने संघटनेचे गावा गावात जिल्ह्यात आणि शहरात संघटनेचे पदाधिकारी असून दारूबंदी सट्टा जुगार ग्रामपंचायत भ्रष्टाचार तसेच रस्ते पाणी अन्न अशा मूलभूत गरजांच्या ठिकाणी होत असलेल्या भ्रष्टाचारावर आळा घालण्याचे व समूळ नष्ट करण्याचे कार्य ही संघटना करीत आहे नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यास भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित होते त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन व सूचना केल्या तसेच नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला सटाणा परभणी येवला धाराशिव मालेगाव नांदगाव व नाशिक या ठिकाणाहून पदाधिकारी उपस्थित होते अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी नाशिक समाचारला मुलाखत देताना अनेक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांना हात घातला
![](https://newnashiksamachar.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Image-2024-04-17-at-18.59.26-1210x642.jpeg)