Blog

शनिवार दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी श्री म्हसोबा महाराज यांची यात्रा संपन्न

म्हसोबा महाराज की जय, श्री म्हसोबा महाराज प्रसन्न,श्री म्हसोबा महाराज हे भाविकांचे आशास्थान बनलेले आहे. नाशिक पुणे हायवे स्थित हे देवस्थान असून याचे संस्थापक कैलासवाशी लक्ष्मणराव गोपाळराव कदम हे होते त्यांच्याच कृपा आशीर्वादाने पुढेही परंपरा कायम चालत आलेली आहे या देवस्थानाची आख्यायिका अशी आहे की या ठिकाणी आपण इच्छा बोलल्यानंतर ती पूर्ण होते, ती पूर्ण झाल्यावर भाविक त्यांच्या इच्छेनुसार पितळेची घंटी या ठिकाणी अर्पण करतात, हजारो घंटा या ठिकाणी भाविकांनी बांधलेल्या दिसून येतात,बऱ्याच शिर्डीला जाणाऱ्या साईबाबांच्या पालख्या या ठिकाणी दर्शनाकरता थांबतात, भाविक या ठिकाणी पितळेची घंटी अर्पण करीत असल्यामुळे या देवस्थानास घंटीचा म्हसोबा महाराज म्हणूनही ओळखले जाते. नाशिक या पुण्यनगरीत बऱ्याच ठिकाणी गावाच्या वेशीवर ही मंदिरे दिसून येतात. फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी या मंदिरास भेट दिलेली आहे त्यात अजय देवगन आणि काजोल तसेच मकरंद अनासपुरे आदी अनेक हिंदी आणि मराठी कलाकार या ठिकाणी नतमस्तक झालेले आहेत, शनिवार दिनांक 20/04/2024 रोजी श्री म्हसोबा महाराज यांची यात्रा संपन्न झाली, त्या प्रित्यर्थ महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच यात्रेनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी बऱ्याच भाविकांनी रक्तदान केले, बऱ्याच रक्ताच्या बाटल्यांचे संकलन यावेळेस करण्यात आले, मोठ्या आनंदाने आणि उत्साहात भाविकांनी यात्रेचा आनंद घेतला असून मोठ्या संख्येने भावीक उपस्थित होते,नाशिक समाचार ब्युरो, नाशिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *