Blog

प्रभुरामचंद्रच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावाने रामनवमी हा सण साजरा

प्रभुरामचंद्रच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावाने रामनवमी हा सण साजरा केला जातो. प्रत्येक राममंदिरामध्ये सडा, रांगोळी,फुलांचे तोरण आणि विदयुत रोषणाईने हा दिवस साजरा होतो. नाशिकरोड येथील मुक्ततीधाम मंदिर येथे दरवर्षी सकाळपासूनच कथा- पुराण, रामनाम जप, मंत्र उच्चार आणि पूजा पाठाने मंदिर गजबजलेले असते. या ठिकाणाहून प्रभू रामचंद्रांची रथयात्रा ही काढली जाते,यामध्ये सर्व नाशिककर आवर्जून उपस्थित राहतात. रामनवमीच्या महत्त्वाबद्दल पौराणिक मान्यता आहे.चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी आयोध्येत राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णूअवतार श्रीरामांचा जन्म झाला.तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या स्वरूपात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मंदिरात, मठात, यज्ञ, हवन, महाप्रसादाचे आयोजन केले जाते. संपूर्ण भारतात उत्साहाचे, आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण या दिवशी बघण्यास मिळते. नाशिक समाचार ब्युरो, नासिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *