तलवारीच्या धारे पेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे, हे सर्वात खतरनाक शस्त्र आहे, म्हणून तलवार हातात न घेता लेखनी हातात घेऊन अन्यायावरती मात करा.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
मला स्वातंत्र्य,समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त भव्य देखावा उभारण्यात आला असून लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक 11 /4/ 2024 रोजी पार पडला. समितीच्या वतीने दरवर्षी भव्य देखावा सादर करण्यात येतो. यावर्षी ही देखावा सादर करण्यात आला आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे. नाशिक पुणे हायवे वरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे, शहरात पार्किंग व्यवस्था जाहीर करण्यात आली असून नागरिकांनी त्याच ठिकाणी वाहने पार करावी असे आवाहनकरण्यात आले आहे.
उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे साहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संदर्भात माहिती व शुभेच्छा दिल्या.