बॉलीवूड हादरले, सुपरस्टार सलमान खानच्या घरावरती फायरिंग, 14 एप्रिल 2024 रोजी पहाटे पाच वाजता सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट वरती दुचाकी वरून आलेल्या दोन शूटर्सने गोळीबार केला त्यातील दोन गोळ्या सलमान खानच्या गॅलरीच्या भिंतीमध्ये घुसल्या असून सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही परंतु याच गॅलरीमधून सलमान खानने ईद च्या शुभेच्छा दिल्या होत्या सलमान चे नशीब बलवत्तर म्हणून ही घटना त्या दिवशी घडली नाही. शुटर्स CCTV कॅमेऱ्यात कैद झाले असून पुढील तपास मुंबई पोलीस करीत आहे, या फायरींगची जिम्मेदारी बोष्णोयी गॅंगने घेतली असून 2018 ला स्टॅलिन बोष्णोयी याने सलमानला धमकी दिली होती,तेव्हा पासून ही गॅंग सलमानच्या मागावर आहे. 1998 ला रात्री घोडा फार्म हाऊस येथे हरणाची शिकार केली होती त्यावेळी सलमान खान वरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झालेला होता. या हरणाची घोषणाही समाज पूजा करतो त्यामुळे बोष्णोयी गँग सलामानला धमकावत होती आणि आता त्याच्या घरावरती फायरिंग करण्यात आली आहे, सलमान खान ला Y+ सुरक्षा देण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत पुढील तपास मुंबई पोलीस करीत आहेत.
Related Articles
धान्य वितरण कार्यालय नाशिकरोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय का ?
धान्य पुरवठा अधिकारी (DSO) नाशिक यांचे धान्य वितरण कार्यालय नाशिक रोड कडे दुर्लक्ष. सामान्य जनतेचे होताहेत हाल. आस्थापणे व्यतिरिक्त व्यक्तीचा कार्यालयावर कब्जा. कामाकरिता पैशांची होते आहे मागणी. वर्षभरापासून कामे आहेत पेंडिंग, कामे लवकरात लवकर झाली नाही तर जन आंदोलन करणार.
नवीन नाशिक समाचार च्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
गुढीपडावा या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून हा सण साजरा होतो. प्रत्येक धर्माचे लोक गुढीपाडव्याचे आपापल्या पद्धतीने स्वागत करतात. हिंदू धर्मामध्ये आपल्या दारामध्ये उंच काठी रोवून त्यावरती नवीन वस्त्र लावले जाते, फुलांच्या माळा, हरडे करडे, कडूलिंबाची पाने, खोबऱ्याची वाटी,गुळ लावून काठीला सजवले जाते,त्यावर तांब्याचा तांब्या ठेवून त्या गुढीची विधिवत पूजा केली […]
नासिक रोड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक प्रमोद गोरे यांच्याकडे दहा लाख रुपये खंडणीची मागणी.
नासिक रोड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक प्रमोद गोरे यांच्याकडे दहा लाख रुपये खंडणीची मागणी. नाशिक रोड परिसरामध्ये अनेक नवनवीन बांधकामांचे प्रोजेक्ट सुरू असताना सध्या नाशिक रोड मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे, तेरा ते तेवीस माजल्यापर्यंत ची उंच उंच मनोऱ्यांचे बांधकाम नाशिकरोड येथे बघण्यास मिळत आहे. जमिनीचे भाव गगनाला भिडले असताना तसेच स्टील सिमेंट वाळू यांचे […]