Blog

नासिक रोड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक प्रमोद गोरे यांच्याकडे दहा लाख रुपये खंडणीची मागणी.

नासिक रोड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक प्रमोद गोरे यांच्याकडे दहा लाख रुपये खंडणीची मागणी. नाशिक रोड परिसरामध्ये अनेक नवनवीन बांधकामांचे प्रोजेक्ट सुरू असताना सध्या नाशिक रोड मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे, तेरा ते तेवीस माजल्यापर्यंत ची उंच उंच मनोऱ्यांचे बांधकाम नाशिकरोड येथे बघण्यास मिळत आहे. जमिनीचे भाव गगनाला भिडले असताना तसेच स्टील सिमेंट वाळू यांचे भाव तेजित असताना बांधकाम व्यवसायिकांना काम पूर्ण करणे जड जात आहे.अशा परिस्थितीत गिर्‍हाईक मिळणे हे सुद्धा खूप अवघड झाले आहे. नाशिक रोड मधील बांधकाम व्यावसायिक प्रमोद गोरे राहणार प्रकाश नगर शिखरेवाडी नासिक रोड रोड. यांनी नाशिक रोड येथे जलतरण तलावा समोर प्रतिभा संकुल, वृषहाईट व ऋतुरुंग तसेच नाशिक मध्ये कालिका मंदिरासमोर सिटी प्लाझा या इमारतींचे बांधकाम पूर्ण केलेले आहे, प्रमोद गोरे हे 21 एप्रिल ला दुपारी दोन वाजता त्यांच्या मालधक्का रोड,नुरी मज्जीद, नाशिक रोड येथे इमारत बांधकाम प्रकल्पाच्या ऑफिसमध्ये बसलेले असताना त्यांच्या ओळखीचे किशोर भारती याने तिथे येऊन मला दहा लाख रुपये दे, नाहीतर मी तुला येथील एकही फ्लॅट विकू देणार नाही, तुझी साईट बंद करून टाकेल माल धक्का आमचा एरिया आहे,अशी धमकी दिली आणि दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली. यावेळी या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी किशोर भारती यांस अटक केली आहे. नाशिक समाचार ब्युरो, नाशिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *